ETV Bharat / state

यवतमाळात अवकाळी पावसामुळे जिनिंगमधील कापूस झाला ओला

ओल्या झालेल्या कापसाची प्रत खालवली जाणार आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र, त्याची दखल घेतल्या न गेल्याने हा कापूस पावसात ओला झाला.

cotton mill yavatmal
कापूस
author img

By

Published : Mar 2, 2020, 6:51 PM IST

यवतमाळ- काल रात्री जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे, पणन महासंघ आणि सीसीआयने खरेदी केलेला जिनिंगमधील कापूस पावसाने ओला झाला आहे. त्यामुळे, कापसाची प्रत घटन्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याने जिल्ह्यात अवकाळी पावसाची संभावना वर्तवली होती. मात्र, तरी देखील पणन आणि सीसीआयने या माहितीची दखल घेतली नाही. सीसीआयच्या हलगर्जीपणानेच कापूस ओला झाल्याचे समजले आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

यवतमाळ येथील कापूस खरेदी केंद्रावर मागील आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणात कापसाची आवक वाढली होती. दरम्यान, पणन महासंघ आणि सीसीआयने ५ लाख २३ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली होती. त्यामुळे, कापूस खरेदी केंद्रावरील जिनिंगमध्ये कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याने २९ फेब्रुवारीपासून कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र, बहुतांश कापूस उघड्यावर होता. तो झाकण्यासाठी कापूस खरेदी केंद्राला पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे, अवाकाळी पावसामुळे पणनचा आणि सीसीआयचा कापूस आणि काही प्रमाणात सरकी ओली झाली.

किती नुकसान झाले याचा सध्या अंदाज व्यक्त केला जाऊ शकत नाही. मात्र, ओल्या झालेल्या कापसाची प्रत खालवली जाणार आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र, त्याची दखल घेतल्या न गेल्याने हा कापूस पावसात ओला झाला. जिल्ह्यातील जवळपास २० हजार क्विंटल कापूस ओला झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे बोलल्या जात आहे.

हेही वाचा- तुरीसह कापूस उत्पादकांना मोठा दिलासा; जिल्हा प्रशासन भाड्याने घेणार गोदाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.