यवतमाळ - कोलाम नावाचे आदिवासी बांधव प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्याच्या डोंगराळ आणि जंगल भागामध्ये राहताता. त्यांच्या वस्तीचा परिसर, त्यांचे अंगण आणि घर हे नित्यनियमाने स्वच्छ ठेवतात. त्यामुळे या भागात रोगराई दिसत नाही. हे लोक कायम स्वच्छता राखत असल्यामुळे आमच्या वस्तीकडे कोरोना कधीच येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
समाज कष्टकरी असून सर्वांची राहणीमान अगदी साधं आहे. ग्रामीण डोंगराळ भागात राहत असूनही हे सर्व स्वच्छतेच्या बाबतीत कुठेच कधीच तडजोड करीत नाहीत. अनेकांची घर मातीची मात्र, दारासमोर झाडून तिथे रांगोळी काढलेली असते. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे या येथील लोकांनीही काळजी घेतली आहे. त्यामुळेच आमच्या वस्तीकडे कोरोना कधीच येणार नाही असा विश्वास येथील नागरिकांना आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील शिवनी कोलाम पोडावर अगदी सकाळी कामकाजाला सुरुवात होते. 450 लोकवस्तीचं ठिकाण असले तरी या भागांमध्ये प्रत्येक घर, अंगण प्रसन्न दिसते. परिसर स्वच्छ केल्याशिवाय ते दुसरे काम करीत नाहीत. रस्त्यावर दिसणारा केर-कचरा कोणालाही दिसताक्षणी
तो उचलून त्याची नीट विल्हेवाट लावतात. लॉकडाऊन असल्यामुळे हे लोक काम असल्याशिवाय घराबाहेर निघत नाही. घरातच राहतात व्यक्तिगत स्वच्छत राखतात. आमचं घर, अंगण आम्ही स्वच्छ ठेवतो. त्यामुळे कोरोना आमच्या गावात येणार नाही असा विश्वास त्यांना वाटतो.