यवतमाळ - यंदाच्या वर्षी उन्हाळी भुईमुगाचे चांगले उत्पादन झाले आहे. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भुईमूग विकायचा कुठे? हा प्रश्न यवतमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे आहे.
यवतमाळ तालुक्यातील वाई या गावात सिंचन सुविधा असलेले बहुतांश शेतकरी दरवर्षी उन्हाळी भुईमूगाचे उत्पादन घेतात. यंदाच्या वर्षीही त्यांनी भुईमुगाचे उत्पादन घेतले. भुईमूगच्या लागवडीवर त्यांनी एकरी 25 हजार रुपये खर्च केला. आता शेतातील पीक काढणीला आले आहे. पण या काढणीसाठी मजुरांना देण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे नाहीत. कारण निघालेला कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा कोरोनामुळे विक्री न झाल्याने घरात पडून आहे. अशात कसेबसे भुईमुग जरी काढले तरी, ते विकायचे कुठे? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
अशातच खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. या हंगामासाठी बियाणे घेण्यासाठी पैसे नाहीत, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीत भुईमूग पिकाला हमीभाव देण्यात यावा, अशी या मागणी आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! मोबाईल न दिल्याने अल्पवयीन मुलाने केली वडिलांची हत्या, चिता पेटवण्याचाही प्रयत्न
हेही वाचा - 'घरीच थांबा अन् सुरक्षित राहा, तुमच्या सेवेसाठी आम्ही आहोत'