ETV Bharat / state

विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्याकडून पिकांची पाहणी; नुकसान भरपाई देण्याचा विश्वास - अतिवृष्टीमुळे सोयाबीन पाण्यात

यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पीक विमा मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

नाना पटोले यांच्याकडून पिकांची पाहणी
नाना पटोले यांच्याकडून पिकांची पाहणी
author img

By

Published : Oct 5, 2020, 6:32 AM IST

Updated : Oct 5, 2020, 6:37 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या शेंगातून कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचे हातचे पीक वाया गेले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यवतमाळ तालुक्याचा नुकसान पाहणी दौैरा केला. यावेळी त्यांनी हिवरी या गावातील रामकृष्ण भोंडे यांच्या शेतात जाऊन कोंब फुटलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पटोले यांच्याकडून पिकांची पाहणी;

अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, ढगफुटी यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. नुकतीच अंदाज आणेवारी जाहीर करण्यात आली. अंतिम आणेवारी निघायची आहे. सर्व पिकांचा नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा मागविण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळावा यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पाऊले उचलणार आहे. शासनाने तात्पुरती मदत करण्यापेक्षा ठोस उपाययोजना करावी याकडे लक्ष घालण्यात येणार आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून घामाचा पैसा घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशाचे ठोस मदत मिळणे गरजेचे आहे, असे नाना पटोले यांनी बोलताना सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे उमरखेड, महागाव, यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुलगाव यासह इतरही तालुक्यातील जवळपास 10 हजार हेक्टर वरील शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे नेते असलेले विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या दौरामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळेल, अशी आशा लागली आहे.

Last Updated : Oct 5, 2020, 6:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.