ETV Bharat / state

Yavatmal Congress : यवतमाळमध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच कोरोनाचे नियमांचे उल्लंघन - यवतमाळ कॉंग्रेस कोरोना नियम बातमी

यवतमाळमध्ये कोरोना रुग्णसंख्या ( Yavatmal Corona Patient ) वाढत असताना शासनाने कडक निर्बंध लागू केले आहे. मात्र, या निर्बंधाचा काँग्रेस नेत्यांना विसर पडला आहे. कोरोनाचे नियम ( Congress Break Crona Rules In Yavatmal ) पायदळी तुडवत माजी आमदार वामनराव कासावार यांनी आपला वाढदिवस ( Wamanrao Kasar Birthday ) साजरा केला आहे.

yavatmal
yavatmal
author img

By

Published : Jan 25, 2022, 6:35 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या (Yavatmal Corona Patient ) वाढत आहे. दिवसाला ३०० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने शासनाने निर्बंध ही कडक केले आहे. मात्र, या निर्बंधाचा काँग्रेस नेत्यांना विसर पडला आहे. कोरोनाचे नियम ( Congress Break Crona Rules In Yavatmal ) पायदळी तुडवत माजी आमदार वामनराव कासावार यांनी आपला वाढदिवस ( Wamanrao Kasar Birthday ) साजरा केला. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे व विधानसभेत वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेसाठी असलेले डॉ. महेंद्र लोढा (Dr. Mahendra Lodha ) यांचा पक्षप्रवेशही त्यांच्या सहकार्‍यांसह घेतला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला महाविकास आघाडीच्यावतीनेच केराची टोपली दाखवली आहे.

नियम केवळ सर्वसामान्यांचा का?

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतो आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यसरकारने काही नियमावली जाहीर केली आहे. तसेच काही प्रमाणात निर्बंधही लावण्यात आले आहे. असे असताना या वाढदिवस व पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला 50 लोकांच्यावर उपस्थिती दिसून आली. यामध्ये राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री प्रा वसंत पुरके, खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वजाहत मिर्झा, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांच्यासह अनेक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमस्थळी असंख्य कार्यकर्ते व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक अंतराचा पूर्णतः फज्जा उडाला होता. या कार्यक्रमात पूर्णपणे करून नियमांना बगल देण्यात आली. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अशा बेजबाबदार वागण्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाचे नियम केवळ सर्वसामान्यांचा का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.