ETV Bharat / state

मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे यवतमाळमध्ये आंदोलन - यवतमाळ जिल्हा लेटेस्ट न्यूज

मोदी सरकारने नुकताच 7 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मात्र या सात वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरल्याचा आरोप करत, राज्यभरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. यवतमाळमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एलआयसी चौकात आज आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे आंदोलन
मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे आंदोलन
author img

By

Published : May 30, 2021, 9:52 PM IST

यवतमाळ - मोदी सरकारने नुकताच 7 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मात्र या सात वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरल्याचा आरोप करत, राज्यभरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. यवतमाळमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एलआयसी चौकात आज आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपाच्या या सात वर्षांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था ढासळली, कोरोना रोखण्यात सरकारला अपयश आले, कोरोना लसीकरणाचे नियोजन करता आले नाही, महागाई वाढत आहे, पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले असून, सामान्य माणूस हवालदील झाला आहे. अशी टीका यावेळी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे आंदोलन

आंदोलनाला 'यांची' होती उपस्थिती

या आंदोलनाला खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, वामनराव कासावार, बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण देशमुख, अशोकराव बोबडे, टिकाराम कोंगरे, मनीष पाटील, जावेद अन्सारी, दिनेश गोगरकर, अनिल गायकवाड, संजय मोघे, जाफर खान, रमेश महानूर, श्रीकांत देशमुख, राजा चव्हाण यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - 'कोरोनाने केली दैना...'; कडबा कुट्टीच्या पार्श्वसंगीतावरील शेतमजुराचे गाणं व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.