यवतमाळ - खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीर भारताचे अंग आहे, याची पूर्तता झाली, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी हिमतीने निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा सुरू आहे. यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जम्मू-काश्मीर मधून ३७० कलम हटवल्याबद्दल मोदी-शाह यांचे अभिनंदन केले. यामुळे विकासापासून वंचित असलेल्या या भागात विकासाचे दालन सुरू होईल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे -
- कोल्हापूर NDRF च्या 2 टीम तैनात आहेत. लष्कराचे 80 जवान लोकांना सुरक्षित स्थळी नेत आहेत. आतापर्यंत 1500 कुटुंबाना बाहेर काढले आहे.
- सांगलीत 1 टीम पोचलिय. आणखी एक टीमसाठी प्रयत्न. चंद्रकांत दादा तिथे आहे. इतर मत्र्यांनाही सूचना केलेल्या आहेत.
- कर्नाटक मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी बोललो आहे, अलमट्टी विसर्ग थोडा कमी करावा. त्यांनीही कोयनेचा विसर्ग कमी करण्याबाबत पत्र लिहलय.
- पूर परिस्थितीवर उद्या (बुधवारी) सकाळी आढावा बैठक घेणार. कालही मी दिवसभर पूरभागाच्या संपर्कात होतो. केंद्र सरकारने सर्वोत्तपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
नाना पटोलेंना मी गंभीरतेने घेत नाही : मुख्यमंत्री
सोमवारी पटोलेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. एका बाजूला राज्यात अस्मानी आणि दुष्काळी संकट तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा करीत आहेत.