यवतमाळ - इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेने देशभरातील जनतेची मने जिंकली आहेत. या मोहिमेचे यथार्थ दर्शन घडविण्यासाठी यवतमाळमधील इंद्रप्रस्थ नगरीतील राजेश शर्मा यांनी 'चांद्रयान-२' मोहिमेचा देखावा सादर केला आहे. भगवान श्री गणेश या चांद्रयानातून चंद्रावर जात असल्याची संकल्पना त्यांनी साकारली आहे. तसेच या देखाव्यातून त्यांनी 'संपर्क तुटला पण संकल्प नाही', असा संदेश दिला आहे.
हेही वाचा - रस्ता ओलांडताना टिप्परची जबर धडक, महिलेचा जागीच मृत्यू
ज्या दिवशी मोहिमेने अवकाशात झेप घेतली त्या दिवशी या मोहीमेचा देखावा यावर्षी सादर करावा, असे त्यांच्या मनात आले आणि या वर्षीच्या गणपती देखाव्यांमध्ये चांद्रयान -2 या मोहिमेची माहिती इतरांनाही कळावी, यासाठी हुबेहूब देखावा सादर केला.
हेही वाचा - यवतमाळमध्ये दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
देखाव्यासाठी शर्मा यांनी टाकाऊ वस्तूपासून काही साहित्याची निर्मिती केली आणि अवकाशात झेप घेणारा चांद्रयान मोहीम आपल्या देखाव्यातून साकारली.