ETV Bharat / state

केंद्रीय पथकाची आर्णी, दिग्रस, पुसद येथील कोविड सेंटरला अचानक भेट

वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आज तिसऱ्या दिवशी आर्णी तालुक्यातील भंडारी, दिग्रस तालुक्यातील इसापूर व पुसद शहरातील कोविड केअर सेंटरला अचानक भेट दिली.

Central team  surprise visit to covid Center

author img

By

Published : Apr 10, 2021, 9:37 PM IST

Updated : Apr 10, 2021, 9:43 PM IST

यवतमाळ - वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आज तिसऱ्या दिवशी आर्णी तालुक्यातील भंडारी, दिग्रस तालुक्यातील इसापूर व पुसद शहरातील कोविड केअर सेंटरला अचानक भेट दिली. यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

केंद्रीय पथकाची कोविड सेंटरला अचानक भेट
कर्मचाऱ्यांची उलट तपासणी -राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेचे प्राध्यापक डॉ. जयंत दास आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देवांग भारती या केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी आर्णी, दिग्रस, पुसद तालुक्याला भेटी देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. प्रतिबंधित क्षेत्राला केंद्रीय पथकाने भेट देऊन पाहणी केली. कोविड केअर सेंटरमध्ये किती जण भरती आहेत, त्यांना काय दिले जाते व काय काय सुविधा आहेत, याबाबत त्यांनी पाहणी केली. तसेच काँटॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, लसीकरण याबाबत उलट तपासणी घेऊन विचारणा सुध्दा करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार उपस्थित असल्याने येथील भोंगळ कारभार उघडकीस आला.

Last Updated : Apr 10, 2021, 9:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.