ETV Bharat / state

कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या तीन बोलेरो जप्त; 7 जणांना अटक

कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्यांवर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईत ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

जनावरे घेऊन जाणाऱ्या तीन बोलेरो जप्त
जनावरे घेऊन जाणाऱ्या तीन बोलेरो जप्त
author img

By

Published : Dec 10, 2020, 12:29 PM IST

यवतमाळ - तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. झारीझामनी तालुक्यातील गणेशपूर येथे सापळा रचून केलेल्या कारवाईत पोलिसांनी तीन बोलेरो वाहनांसह 13 जनावरे जप्त केली आहेत. या कारवाई सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Cattle  rescued from a pickup
कत्तलीसाठी जाणारी जनावरे सुटका केल्यानंतर

जनावरांची कोंडवाड्यात रवानगी-

आरोपी मोहम्मद युनूस मोहम्मद नूर (32 रा. बेला (तेलंगणा), शंकर मिळविले (25 रा. (डोर्ली), भोलाराम पडोळे (25 रा. डोर्ली), गणेश धानोरकर (28 रा. अडेगाव), किशोर जींनावार (30), विनोद रासमवार दोघेही (रा. मुकुटबन) व राजू झिलपे (25 रा. वणी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर पशु संरक्षण अधिनियमसह प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, मोटर वाहन अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. कत्तली करिता जाणाऱ्या १३ बैलाची सुटका करून मुकुटबन येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे.

जनावरे घेऊन जाणाऱ्या तीन बोलेरो जप्त

या कारवाईत बोलेरो गाडी (एमएच 29 व्हीई 1687) (एमएच 32 एजे 1193) व (एमएच 34 बीजी 2884) जप्त केल्या. तीन बोलेरो गाडी किंमत सुमारे 9 लाख व 13 बैल किंमत सुमारे 2 लाख 60 हजार असा एकूण 11 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कार्यवाही ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, जमादार अशोक नैताम, राम गडदे व प्रवीण ताडकोळवार यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.