ETV Bharat / state

Cannabis Plants Yawatmal : कापूस-तुरीच्या पिकात गांजाची झाडे; शेतकऱ्याला अटक

रामगाव-डोर्ली येथील शेतकरी सुरेश आत्माराम आडे यांच्या मालकीचे शेत आहे. या शेतात कापूस आणि तुरीच्या ओळीत गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ( Cannabis Plants in Cotton Farm ) याप्रकरणी शेतकरी सुरेश आत्माराम आडेला अटक करण्यात आली आहे. ( Cannabis Plants in Cotton Farmer arrested )

Cannabis plants in cotton farm yawatmal, farmer arrested
कापूस-तुरीच्या पिकात गांजाची झाडे
author img

By

Published : Nov 30, 2021, 5:20 PM IST

यवतमाळ - शेतात कापूस आणि तुरीच्या ओळीत गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ( Cannabis Plants in Cotton Farm ) ही घटना दिग्रस तालुक्यातील रामगाव-डोर्ली येथे घडली. ( Cannabis Plants in cotton Farm Digras Yawatmal ) याबाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकासह येथील पोलिसांनी थेट शेतातच छापा टाकला. याप्रकरणी शेतकरी सुरेश आत्माराम आडेला अटक करण्यात आली आहे. ( Cannabis Plants in Cotton Farmer Arrested )

काय आहे प्रकार?

रामगाव-डोर्ली येथील शेतकरी सुरेश आत्माराम आडे यांच्या मालकीचे शेत आहे. त्यांनी कापूस आणि तुरीच्या ओळीत गांजाच्या 43 झाडांची लागवड केली होती. शेतकरी गांजाचे पीक घेत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर ठाणेदार सोनाजी आमले, एलसीबीचे प्रमुख प्रदीप परदेशी यांच्यासह एपीआय विजय रत्नपारखी आदींनी थेट शेत गाठले. पोलीस पथकाने शेतात सर्वत्र गांजाची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी कापूस आणि तूर पिकाच्या काही ओळींमध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याचे दिसून आले.

हेही वाचा - Special Story : काय सांगता?.. यवतमाळच्या अब्बासने कागदावर उकळला चहा

पोलिसांनी 43 गांजाची झाडे मुळासकट जप्त केली. मुळासकट या झाडांचे वजन 57 किलो आहे. तर त्याच्या पानांचे वजन 30 किलो आहे. या सर्वांची एकूण किंमत दोन लाख 88 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून सुरेश आडे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास एलसीबी आणि येथील दिग्रस पोलीस ठाणे करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.