यवतमाळ : कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात भावानेच भावाला मारहाण केली. या मारहाणीत संबंधित तरुण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. निर्घुण खूनाची ही गंभीर घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घाटंजी तालुक्यातील साखरा गावात घडली. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मारेकरी भावाला ताब्यात (Brother killed brother due to family dispute) घेतले.
कौटुंबिक कारणावरून वाद : विशाल मेश्राम (24) रा. साखरा असे निर्घृण खून झालेल्या तरुणाचे नाव (Brother killed in Yavatmal) आहे. तर दिलीप मेश्राम असे मारेकराचे नाव गुरुवारी सायंकाळी विशाल आणि त्याच्या भावात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोघेही एकमेकांच्या अंगावर चालून गेले. त्यामध्ये भावाने विशालला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन विशाल हा जागीच ठार (Brother killed brother in Yavatmal) झाला.
खुनाचा गुन्हा : या घटनेची माहिती मिळताच घाटंजीच्या प्रभारी ठाणेदार सुष्मा बाविस्कर यांनी पथकासह साखरा गाठले. त्यानंतर घटनास्थळाची आणि मृतदेहाची बारकाईने पाहणी केली. शिवाय, पंचनामा केला. तसेच विशालचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यानंतर गावातूनच विशालच्या मारेकरी भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू (Brother killed due to family dispute in Yavatmal) होती.