यवतमाळ - क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात तरूणावर दोघांनी धारदार शस्त्राने वार करीत त्याची निघृण हत्या केल्याची घटना घडली. शहरातील वडगाव भागात असलेल्या मुलकीतील एका टॉवरजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. प्रफुल उर्फ बाबू गणेश बडदे (22, रा. मुलकी, यवतमाळ) असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसांनी सतीश कुचनकर (रा. दांडेकर ले-आऊट) आणि गोलू उर्फ सुरज घायवान (रा. राधाकृष्ण नगरी) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
जुन्या वादातून केली हत्या
शहरातील वडगाव परिसरातील मुलकी भागात प्रफुल उर्फ बाबू बडदे हा कुटूंबीयांसह राहात असून मजूरीचे काम करीत होता. सोमवारी बाबू बडदे याचा मित्र दुर्गेश ढोले याचे गोलू उर्फ सुरेश घायवान याच्यासोबत जांब येथे वाद झाला. ही बाब दुर्गेश याने बाबूला सांगितल्याने वाद मिटविण्यासाठी बाबू बडदे, दुर्गेश ढोले काही मित्रांसह जांब येथे गेले. दरम्यान त्या ठिकाणी सतिश कुचनकर आणि गोलू उर्फ सुरेश घायवान यांच्यासोबत पुन्हा वाद झाला. त्यानंतर बाबू बडदे, दुर्गेश ढोले आणि त्याचे साथीदार परत मुलकी येथे आले. दरम्यान मध्यरात्री सुमारास बाबू बडदे हा टॉवरजवळ झोपला होता. त्यावेळी त्याचा मित्र दुर्गेश ढोले आणि इतर साथीदार तिथेच एका लाईटजवळ उभे होते. अश्यातच सतीश कुचनकर आणि सुरेश घायवान दोघे त्या ठिकाणी दुचाकीने आले आणि त्यांनी झोपेत असलेल्या बाबू बडदे याच्या तोंडावर, मानेवर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करीत त्याची निघृण हत्या केली.
पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर, अवधुतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्यासह एलसीबीतील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस उपनिरिक्षक दर्शन दिकोंडवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता जिल्हा रूग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी सचिन गणेश बडदे ( २८ रा. मुलकी) याने अवधूत वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास सुरु आहे.
यवतमाळ; धारदार शस्त्राने वार करून तरूणाची निघृण हत्या - boy murder yavatmal news
यवतमाळ शहरातील वडगाव परिसरातील मुलकी भागात प्रफुल उर्फ बाबू बडदे हा कुटूंबीयांसह राहात असून मजूरीचे काम करीत होता. सोमवारी बाबू बडदे याचा मित्र दुर्गेश ढोले याचे गोलू उर्फ सुरेश घायवान याच्यासोबत जांब येथे वाद झाला.