यवतमाळ- परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी भाजपची मागणी आहे. या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा व भारतीय जनता पक्ष यवतमाळ शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील चौकात काँग्रेसचे ऊर्जामंत्री नितीन राऊत याना काळे झेंडे दाखवले.
महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसने गाव तिथे आंदोलन अभियानाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज गावागावात मशाल आंदोलन होणार होते. याचाच एक भाग म्हणून यवतमाळ येथे मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी, भाजप युवा मोर्चा व भारतीय जनता पक्ष यवतमाळ शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील चौकात काँग्रेसचे ऊर्जामंत्री नितीन राऊत याना काळे झेंडे दाखवले. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, वीज बिल माफ करण्यात यावे, अशी मागणी करीत काँग्रेस नेत्यांना भाजपकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा- बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज कालवश; सोमवारी होणार अंत्यसंस्कार