ETV Bharat / state

यशोमती ठाकूर राजीनामा द्या; अमरावतीत भाजपचे आंदोलन - अमरावती मंत्री यशोमती ठाकूर बातमी

यशोमती ठाकूर स्वतः राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी यशोमाती ठाकूर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, असे किरण पातूरकर ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणले. या आंदोलनात शहर आणि जिल्ह्यातील भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

bjp protested for resignation of minister yashomati thakur in amravati
अमरावतीत भाजपचे आंदोलन
author img

By

Published : Oct 29, 2020, 7:41 PM IST

अमरावती - 2012 मध्ये आमदार असताना पोलीस शिपायाला मारहाण केल्या प्रकरणात न्यायायलयाने दोषी ठरविले असल्याने यशोमती ठाकूर यांनी मंत्रीपदासह आमदारकीचा राजीनामा द्यावा. या मागणीसाठी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यशोमती ठाकूर राजीनामा द्या; भाजपचे आंदोलन
शहरातील गांधी चौक परिसरात एकेरी मार्ग असताना यशोमती ठाकूर यांचे वाहन घुसल्याने वाहतूक पोलीस शिपाई विलास वराळे यांनी हटकले असताना त्यांना यशोमती ठाकूर आणि त्यांच्या वाहनातील दोघांनी मारहाण केली होती. या प्रकरणात यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 ऑक्टोबरला दोषी ठरविले. न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपने यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असताना गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांच्या नेतृत्वात बेमुदत साखळी आंदोलन करण्यात आले आहे.

यशोमती ठाकूर स्वतः राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी यशोमाती ठाकूर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, असे किरण पातूरकर ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणले. या आंदोलनात शहर आणि जिल्ह्यातील भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.