यवतमाळ - जिल्ह्यातील पुसद येथे खड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. पुसद शहरातील खड्डे बुजविण्यासाठी नगरसेवक साकिब शहा यांनी अनोखे भीक मांगो आंदोलन केले आहे.या आंदोलनाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या कराच्या पैशातून जनसुविधा उभारण्याचे कर्तव्य पालिकेकडे आहे. असे असूनसुद्धा पालिका मात्र कुंभकर्णासारखी झोप घेत आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - परमबीर प्रकरण : काँग्रेस मंत्र्यांची पाच वाजता महत्वाची बैठक
गोळा झालेल्या वर्गणीतून रस्त्याची डागडुजी
पुसद शहराची अवस्था एका खेड्यापेक्षाही अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे साकिब यांनी पालिकेचे याकडे लक्ष वेधण्यासाठी भीक मांगो आंदोलन सुरु केले आहे. गोळा झालेल्या वर्गणीतून रस्त्याची डागडूजी करण्यात येणार आहे. साकिब यांनी शहराच्या मुख्य चौकात गळ्यात भीक मागो आंदोलनाचे बॅनर घालून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हातात माईक घेऊन पालिकेच्या निष्क्रीयतेचा पाढाच वाचून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. साकिब यांच्या आंदोलनाची शहरात मोठी चर्चा आहे. निदान या आंदोलनांनंतर तरी नगरपालिका जागे होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे.
हेही वाचा - इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल