ETV Bharat / state

निर्बंध शेतकऱ्यांवरच का?; पोळा सणाच्या उत्साहावर कोरोना निर्बंधाचे विरजण - पोळा सण सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यास बंदी

शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा मानाचा पोळा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याला बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घातली जाते. त्यांच्या शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. नाना तर्‍हेने बैलांना सजविण्यात येते. मात्र यंदा पोळा सणावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पोळा सणाच्या उत्साहावर कोरोना निर्बंधाचे विरजण

author img

By

Published : Sep 5, 2021, 8:26 AM IST

Updated : Sep 5, 2021, 8:11 PM IST

यवतमाळ - श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो. यंदा कोरोना निर्बंधामुळे पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. यंदाही शेतकऱ्यांना गर्दी टाळून पोळा सण साजरा करावा लागणार आहे. पोळा अवघ्या एक दिवसांवर आला आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील साहित्य खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आपल्या सर्जा राजाच्या सजावटीसाठी देखील यंदा शेतकऱ्यांना हात आखडता घ्यावा लागला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पोळा सणाच्या उत्साहावर कोरोना निर्बंधाचे विरजण
कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण
श्रावणी पोळा म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकऱ्यांचा सण. वर्षभर शेतकऱ्यांबरोबर बैल शेतात राबतात. त्यामुळेच बळीराजा आपल्यासोबत शेतात राबून घाम गाळणाऱ्या बैलांसाठी एक दिवस उपवास करून त्या बैलाची सजावट करून त्याला गोडधोड खाऊ घालून त्याची पूजा करतो. त्याच्या पायावर डोकं टेकवून दर्शन घेतो आणि त्याच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण दिवाळी सणापेक्षा महत्वाचा म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र यंदाही कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. तर कोरोना निर्बंधामुळे पोळा सणाच्या उत्साहात खोडा निर्माण झाला आहे.
पोळा सणाच्या उत्साहावर कोरोना निर्बंधाचे विरजण
पोळा सणाच्या उत्साहावर कोरोना निर्बंधाचे विरजण

ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात, व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्व आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा मानाचा पोळा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याला बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घातली जाते. त्यांच्या शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. नाना तर्‍हेने बैलांना सजविण्यात येते.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी करता येणार नाही-

ग्रामीण भागात वेशीमध्ये पोळा भरविला जातो. यंदा मात्र कोरोना निर्बंधात शेतकऱ्यांना घरीच बैलाची पूजा करावी लागणार आहे. गर्दी टाळून नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र यंदा राज्य सरकारने पोळा सणावर निर्बंध लादले आहेत.गर्दी न करता पोळा सण साजरा करावा मिरवणुका काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने एकीकडे दारू दुकाने, बिअर शॉपी, हॉटेल, उपहार गृह उघडले, समारंभ, कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पोळा या सणावर निर्बंध का असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच पोळा सणावर कोणत्याही प्रकारचे कोरोनानिर्बंध लादू नयेत, शेतकऱ्यांना पोळा सण साजरा करू द्यावा, तशी परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची बाजारापेठेकडे पाठ-

प्रतिवर्षी बळीराजा आपल्या दावणीवरच्या बैल जोडीला आणि जनावरांसाठी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. बैलांना झूल, रंगवण्यासाठी रंग, डौलदार शिंगात अडकवण्यासाठी गोंडे, खळखळ वाजणाऱ्या घुंगरांच्या चंगाळ्या , नवीन कासरा या सर्व साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची एक महिना भरापासून तयारी सुरू असते. त्यातच पोळा सण होताच रब्बीच्या पेरणीसाठी शेतकरी टिपन उचलतो. त्यामुळे शेतकरी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. मात्र यंदा शेतकऱ्याच्या हातात पैसा उरला नाही, त्यामुळे पोळा सणानिमित्त बाजारात फारशी गर्दी होताना दिसून येत नाही. त्यातच बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची तडजोड करावी लागणार असल्याची प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी दिली.

यवतमाळ - श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो. यंदा कोरोना निर्बंधामुळे पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. यंदाही शेतकऱ्यांना गर्दी टाळून पोळा सण साजरा करावा लागणार आहे. पोळा अवघ्या एक दिवसांवर आला आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील साहित्य खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आपल्या सर्जा राजाच्या सजावटीसाठी देखील यंदा शेतकऱ्यांना हात आखडता घ्यावा लागला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पोळा सणाच्या उत्साहावर कोरोना निर्बंधाचे विरजण
कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सणश्रावणी पोळा म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकऱ्यांचा सण. वर्षभर शेतकऱ्यांबरोबर बैल शेतात राबतात. त्यामुळेच बळीराजा आपल्यासोबत शेतात राबून घाम गाळणाऱ्या बैलांसाठी एक दिवस उपवास करून त्या बैलाची सजावट करून त्याला गोडधोड खाऊ घालून त्याची पूजा करतो. त्याच्या पायावर डोकं टेकवून दर्शन घेतो आणि त्याच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण दिवाळी सणापेक्षा महत्वाचा म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र यंदाही कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. तर कोरोना निर्बंधामुळे पोळा सणाच्या उत्साहात खोडा निर्माण झाला आहे.
पोळा सणाच्या उत्साहावर कोरोना निर्बंधाचे विरजण
पोळा सणाच्या उत्साहावर कोरोना निर्बंधाचे विरजण

ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात, व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्व आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा मानाचा पोळा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याला बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घातली जाते. त्यांच्या शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. नाना तर्‍हेने बैलांना सजविण्यात येते.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी करता येणार नाही-

ग्रामीण भागात वेशीमध्ये पोळा भरविला जातो. यंदा मात्र कोरोना निर्बंधात शेतकऱ्यांना घरीच बैलाची पूजा करावी लागणार आहे. गर्दी टाळून नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र यंदा राज्य सरकारने पोळा सणावर निर्बंध लादले आहेत.गर्दी न करता पोळा सण साजरा करावा मिरवणुका काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने एकीकडे दारू दुकाने, बिअर शॉपी, हॉटेल, उपहार गृह उघडले, समारंभ, कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पोळा या सणावर निर्बंध का असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच पोळा सणावर कोणत्याही प्रकारचे कोरोनानिर्बंध लादू नयेत, शेतकऱ्यांना पोळा सण साजरा करू द्यावा, तशी परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची बाजारापेठेकडे पाठ-

प्रतिवर्षी बळीराजा आपल्या दावणीवरच्या बैल जोडीला आणि जनावरांसाठी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. बैलांना झूल, रंगवण्यासाठी रंग, डौलदार शिंगात अडकवण्यासाठी गोंडे, खळखळ वाजणाऱ्या घुंगरांच्या चंगाळ्या , नवीन कासरा या सर्व साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची एक महिना भरापासून तयारी सुरू असते. त्यातच पोळा सण होताच रब्बीच्या पेरणीसाठी शेतकरी टिपन उचलतो. त्यामुळे शेतकरी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. मात्र यंदा शेतकऱ्याच्या हातात पैसा उरला नाही, त्यामुळे पोळा सणानिमित्त बाजारात फारशी गर्दी होताना दिसून येत नाही. त्यातच बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची तडजोड करावी लागणार असल्याची प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी दिली.

Last Updated : Sep 5, 2021, 8:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.