ETV Bharat / state

अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या मालखान्यात हेराफेरी, जप्तीतील सोन्यावर डल्ला - yavatmal news

यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील मालखान्यात 6 वर्षांपूर्वी झालेल्या हेराफेरीचे प्रकरण आता उजेडात आले. पोलीस निरीक्षकाने चेनस्नॅचरकडून सोन्याचा ऐवज हस्तगत करून मालखान्यात जमा केला होता. मात्र जप्तीतील 300 ग्रॅम सोने मालखान्यात नाही अशी माहिती पुढे आली. प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले आहेत.

अवधूतवाडी पोलीस ठाणे
अवधूतवाडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Oct 23, 2020, 11:58 AM IST

यवतमाळ : अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील मालखान्यात 6 वर्षांपूर्वी हेराफेरी झाल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. जप्तीच्या सोन्यात अफरातफर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले आहेत. प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्याकडे देण्यात आली. घोटाळ्याप्रकरणी मालखान्याचे पुन्हा निरीक्षण करून रेकॉर्ड तपासले जाईल, अशी माहिती माधुरी बाविस्कर यांनी दिली.

अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या मालखान्यात हेराफेरी

यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील मालखान्यात 6 वर्षांपूर्वी झालेल्या हेराफेरीचे प्रकरण आता उजेडात आले आहे. त्यामुळे आधीच वादग्रस्त ठाणे म्हणून ओळख असलेल्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. 6 वर्षांपूर्वी येथे असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाने चेनस्नॅचरकडून सोन्याचा ऐवज हस्तगत करून मालखान्यात जमा केला होता. मात्र जप्तीतील 300 ग्रॅम सोने मालखान्यात नाही अशी माहिती पुढे आली. त्यामुळे आरोपी व त्यांच्याकडून जप्त सोन्याच्या ऐवजाबाबत संपूर्ण कारवाई झाली नसावी, अशी शंका व्यक्त होत आहे.

गुन्ह्यात वापरलेला तसेच चोरांकडून आणि आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा मालखान्यात जमा केला जात असतो. यात सोन्याचांदीचा ऐवज, अग्निशस्त्रे, शस्त्रे यांसह जप्तीतील दारू आदी मुद्देमाल ठेवण्यात येत असतो. याबाबतची नोंद मालखाना मोहर्ररला ठेवावी लागते. वेळोवेळी त्याचे निरीक्षणही गरजेचे असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बघून ही अफरातफर झाल्याची चर्चा आहे.

यापूर्वी 2015 मध्ये देखील मालखान्यातून ४१ लाख ५० हजार रुपये लंपास करण्यात आले होते. आता तर सोन्याचा ऐवज गायब झाला आहे. याप्रकरणी ठाणेदारांचे पथक तपास करीत होते. मात्र प्रकरण गंभीर असल्याचे बघून उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी चौकशी सुरु केली आहे. त्यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशन गाठून संबंधित कागदपत्रे व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून विचारपूस केली. लवकरच मालखान्यातील गोलमाल बाहेर येण्याची चिन्हे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.