ETV Bharat / state

जादूटोणा संशयातून दाम्पत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावातील प्रकार - यवतमाळ जादूटोणा संशय

जादूटोणा करत असल्याच्या संशयातून सात जणांनी दाम्पत्यावर हल्ला करून जखमी केले. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आाहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील तरोडा येथे घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

yavatmal
पोलिसांनी केली आरोपीला अटक
author img

By

Published : Feb 22, 2022, 6:46 PM IST

Updated : Feb 22, 2022, 7:21 PM IST

यवतमाळ - जादूटोणा करत असल्याच्या संशयातून सात जणांनी दाम्पत्यावर हल्ला करून जखमी केले. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आाहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील तरोडा येथे घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक राजीव हाके

असे आहे प्रकरण?

तरोडा गावातील रहिवासी विनायक ग्यानबा भोरे हा जादूटोणा करतो असा ग्रामस्थांना संशय असल्यामुळे ग्रामस्थांनी सोमवारी रात्री त्यांच्या घरावर हल्ला केला. घर जाळून विनायक भोरे यांना मारहाण करण्यात आली. या घटनेत विनायक भोरे गंभीर जखमी झाले आहेत.

अंधश्रद्धेतून घडला प्रकार

या प्रकरणात जखमी विनायक भोरे यांच्या पत्नीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी काही ग्रामस्थ एका भोंदू बाबाकडे गेले होते. त्याने गावात राहणाऱ्या काळ्याकुट्ट माणसाने करणी केली, असे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी भोरे दाम्पत्याचे घर जाळून साहित्याचे नुकसानही करण्यात आले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तीन महिन्यापूर्वी दिली होती तक्रार

ग्रामस्थांकडून होणाऱ्या त्रासाबाबत भोरे यांनी पोफाळी पोलीस ठाण्यात तीन महिन्यांपूर्वी तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी समजूत घालून त्यांना गावी परत पाठवले, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. अंधश्रद्घेतून घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सात जणांना अटक

पोफाळी पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत सात जणांविरुद्घ गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजीव हाके यांनी दिली.

Last Updated : Feb 22, 2022, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.