ETV Bharat / state

होम डिलिव्हरीची परवानगी मिळताच नियम धाब्यावर; वाइन शॉपवर तळीरामांची गर्दी

author img

By

Published : Apr 28, 2021, 5:29 PM IST

प्रशासनाच्या आदेशानुसार सकाळी 7 ते 11 या कालावधीत आज पासून ही दुकाने उघडण्यात आली. मात्र, प्रशासनाने दारू विक्रीकरिता काही नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने ग्राहकाला दारू दुकानावर किंवा बारमधून दारू विकत घेता येणार नाही. फक्त ग्राहकाला दारू मागवायची असल्यास फक्त दुकानातून त्याला होम डिलिव्हरीच्या माध्यमातूनच मिळणार आहे.

As soon as home delivery was allowed, the middlemen crowded the wine shop, breaking the rules
होम डिलीवरीची परवानगी मिळताच नियम धाब्यावर; वाईन शॉपवर तळीरामांची गर्दी

यवतमाळ - प्रशासनाने मद्यविक्री बाबत होम डिलिव्हरीची परवानगी देण्यात आली आहे.तसे पत्र जिल्हा प्रशासनाने काढले आहे. आज ही होम डिलिव्हरीची सुविधा सुरू झाली असली तरी सर्व नियम धाब्यावर बसून दारूच्या दुकानावर मद्यप्रेमींनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले आहे.

दुकानावर होणार का कारवाई -

प्रशासनाच्या आदेशानुसार सकाळी 7 ते 11 या कालावधीत आज पासून ही दुकाने उघडण्यात आली. मात्र, प्रशासनाने दारू विक्रीकरिता काही नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने ग्राहकाला दारू दुकानावर किंवा बारमधून दारू विकत घेता येणार नाही. फक्त ग्राहकाला दारू मागवायची असल्यास फक्त दुकानातून त्याला होम डिलिव्हरीच्या माध्यमातूनच मिळणार आहे. असे असले तरी जिल्ह्यातील वणी येथे नियमांचे सर्रास उल्लंघन करून वाइन शॉप आणि बार मधून तळीरामांना थेट विक्री करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून दारू न मिळाल्याने तळीरामांचा घसा कोरडा असल्याने तळीरामांनी दुकानावर दारू खरेदीसाठी एकच झुंबड केली. काही जणांनी पुन्हा लॉक डाऊन लागेल या भीतीने जास्तीची दारूही विकत घेतली. यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग या दुकानावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

वणीत नऊ लोकांचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू -

विशेष म्हणजे यवतमाळच्या वणीमध्ये ब्रेक द चेन अंतर्गत मद्याविक्रीची दुकान बंद होती. त्यावेळी दारू न मिळाल्याने काहींनी सॅनिटायझर घेतले होते. त्यात चार दिवसात नऊ लोकांचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाला होता. आज मात्र मद्यविक्रीच्या दुकानांना होम डिलिव्हरीची सुविधा देण्यात आली तरी आज अनेक मद्यप्रेमींनी वणीच्या एका मद्याच्या दुकानासमोर मोठी गर्दी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.