ETV Bharat / state

यवतमाळमध्ये ‘आदित्य संवाद’, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आदित्य ठाकरेंची दिलखुलास उत्तरे

author img

By

Published : Aug 29, 2019, 11:59 AM IST

आदित्य संवाद कार्यक्रमाचे यवतमाळमध्ये आयोजन करण्यात आले होते. आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमात तरुणांच्या प्रश्नाला उत्तरे दिली.

आदित्य संवाद कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ - राज्य शासनाने सुरू केलेल्या महापरीक्षा महापोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना सुरळीत सेवा द्यायची असेल तर राज्य भारनियमनमुक्त झाले पाहिजे, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले. ते यवतमाळ येथे ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमात बोलत होते. ‘ऑनलाईन’ हा प्रकार भयानक असून ‘ऑफलाईन’ पद्धतीनेच स्पर्धा परीक्षांचे अर्ज व इतर कामे व्हावीत, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. यवतमाळच्या पोस्टल मैदानावर आज आदित्य ठाकरे यांचा 'आदित्य संवाद' कार्यक्रम झाला.

आदित्य संवाद कार्यक्रमाचे आयोजन

जिल्ह्यातील प्रमुख महाविद्यालयातील तरुणाईशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधत त्याचे प्रश्न जाणून घेतले आणि प्रश्नांचे काही प्रमाणात निराकरणही केले.आदित्य ठाकरे यांच्या संवाद कार्यक्रमात तरुणाईने मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले. यावेळी स्थानिक मुद्दे, बस नसल्याचा प्रॉब्लेम, महापरीक्षा पोर्टलबाबत तक्रार, शिवाय नेरमध्ये शिवसेनेने सुरू केलेल्या वाचनालयात पुस्तके नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेनेने राजीनामा का दिला नाही. असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले. यात बहुतांश प्रश्नांना उत्तरे आदित्य ठाकरे यांनी दिली. सरकारमधून बाहेर पडल्यास काही कावळे सत्तेसाठी वाट पाहत होते, त्यामुळे सत्तेत राहून काम केले. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सेनेकडून मदत देण्यात आली.

एकूण 1200 प्रश्न या ठिकाणी प्राप्त झाले होते त्यातील काही प्रश्न घेण्यात आले. उर्वरित प्रश्नांची उत्तरे मुंबईहून त्यांचे निराकरण करून देण्यात येतील अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित तरुणाईला दिली. युवकांना राजकारणात उज्ज्वल भविष्य आहे. या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करावा, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. मुलींना आत्मसंरक्षणासाठी युवासेना आणि अभिनेता अक्षयकुमार वर्ग सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोष सिद्ध झाल्यानंतर बलात्काऱ्यास चौकात फाशी द्यावी आणि अत्याचाराच्या प्रकरणांची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, असे मतही त्यांनी एका विद्यार्थिनीच्या प्रश्नावर व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजची शिक्षण व्यवस्था बदलावी लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार बालाजी किनीकर, पूर्वेश सरनाईक, जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकाऱ्यांसह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

Intro:Body:यवतमाळ : राज्य शासनाने सुरू केलेल्या महापरीक्षा महापोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना सुरळीत सेवा द्यायची असेल तर पहिले राज्य भारनियमनमुक्त झाले पाहिजे, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यवतमाळ येथे ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमात बोलताना म्हणाले. ‘ऑनलाईन’ हा प्रकार भयानक असून ‘ऑफलाईन’ पद्धतीनेच स्पर्धा परीक्षांचे अर्ज व इतर कामे व्हावी. असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. यवतमाळ च्या पोस्टल मैदानावर आज आदित्य ठाकरे यांच्या आदीत्य संवाद कार्यक्रम पार पडला. यात जिल्ह्यातील प्रमुख महाविद्यालयातील तरुणाईशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधत त्याचे प्रश्न जाणून घेतले आणि त्याच काही प्रमाणात निराकरण सुधा केले. आदित्य ठाकरे यांच्या संवाद कार्यक्रम मध्ये तरुणाई ने मोठ्या प्रमाणात प्रश्नांची सरबती आदित्य ठाकरे याच्यावर केली. यावेळी
स्थानिक मुद्दे, बस नसल्याचा प्रॉब्लेम,
महापरिक्षा पोर्टल बाबत तक्रार, शिवाय नेर मध्ये शिवसेने ने सुरू केलेल्या वाचनालयात पुस्तके नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्न साठी शिवसेनेने राजीनामा का दिला नाही. असे एक अनेक प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचरण्यत आले. यात बहुतांश प्रश्नांना उत्तरे आदित्य ठाकरे यांनी दिली. सरकार मधून बाहेर पडल्यास काही कावळे सत्ते साठी वाट पाहत होते त्यामुळे सत्तेत राहून काम केली. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी शिवसेनेचे प्रयन्त आहेत. शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटूंबना सेने कडून मदत देण्यात आली.
एकूण 1200 प्रश्न या ठिकाणी प्राप्त झाले होते त्यातील काही प्रश्न घेण्यात आले,
उर्वरित प्रश्नांची उत्तरे मुंबई हुन त्याच निराकरण करून देण्यात येईल अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित तरुणाई ला दिली. विद्यार्थ्यांनी जवळपास एक हजार २०० प्रश्न या कार्यक्रमासाठी दिले होते. युवकांना राजकारणात उज्ज्वल भविष्य असून या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करावा, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. मुलींना आत्मसंरक्षणासाठी युवासेना आणि अभिनेता अक्षयकुमार वर्ग सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोष सिद्ध झाल्यानंतर बलात्काऱ्यास चौकात फाशी द्यावी आणि अत्याचाराच्या प्रकरणांची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, असे मतही त्यांनी एका विद्यार्थिनीच्या प्रश्नावर व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजची शिक्षण व्य्वस्था बदलावी लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार बालाजी किनीकर, पूर्वेश सरनाईक, जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकाऱ्यांसह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.