ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

author img

By

Published : Dec 9, 2020, 8:05 PM IST

क्लासवरून घरी परतत असलेल्या मुलीला दुचाकीवर बसवून नेत, अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुणवंता गेडाम (रा. डोंगरखर्डा, ता. कळंब) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी ही शिक्षा सुनावली.

Rape of a minor girl
अत्याचारप्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

यवतमाळ- क्लासवरून घरी परतत असलेल्या मुलीला दुचाकीवर बसवून नेत, अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुणवंता गेडाम (रा. डोंगरखर्डा, ता. कळंब) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी ही शिक्षा सुनावली.

दोन जून 2017 रोजी अल्पवयीन मुलगी क्लासवरून घरी परतत असताना शहरातील ऑटो पॉइंटवर आरोपीने मुलीला बळजबरीने दुचाकीवर बसवले, त्यानंतर आरोपीने रावेरी गावाच्या परिसरात या मुलीवर अत्याचार केला. आरोपीने मोबाईमध्ये चित्रीकरण देखील केले. तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या मुलीला देण्यात आली होती. या प्रकरणी पीडितेने राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपीला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सात साक्षीदारांनी दिली साक्ष

जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यात तो दोषी आढळल्याने त्याला 10 वर्षांची शिक्षा व दहा हजारांचा दंड, तसेच दंड न भरल्यास आणखी 6 महिने शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.