ETV Bharat / state

Cotton Surpasses 10 Thousand Quintal : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुखाची लहर, 10 हजार प्रतिक्विंटल मिळाला भाव - कापसाला प्रतिक्विटल 10 हजार रुपये भाव

मोठ्या काळानंतर कापसाच्या भाजार भावाने उसळी घेतली आहे. कापसाची कमी उपलब्धता आणि बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चार ठिकाणी कापसाच्या दराने दहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे.(Cotton Surpasses 10 Thousand Quintal) फुलसावंगी बाजारपेठेत कापसाला सर्वाधिक १० हजार ४०० रुपयांचा विक्रमी दर मिळाला. यवतमाळ, राळेगाव आणि वणी (Cotton Surpasses 10 Thousand) बाजारपेठेतही कापसाचा दर दहा हजारांच्या 440 पार झाला आहे.

कापसाचे भाव वाढले
कापसाचे भाव वाढले
author img

By

Published : Jan 7, 2022, 7:16 AM IST

यवतमाळ - मागील आठवड्यापासून कापसाचे दर साडेनऊ हजारावरून एकदम दहा हजारावर गेले आहेत. (PRICES OF Kapas Touched a Historic High) तर, दोन दिवसांपासून हाच कापूस दहा हजार 400 ते दहा हजार 500 रुपये प्रति क्विंटलने विकला जात आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मोठ्या काळानंतर या भावात कापूस विकला जात आहे. (Cotton Surpasses 10 Thousand Quintal) कापसाची कमी उपलब्धता आणि बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चार ठिकाणी कापसाच्या दराने दहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे. (Agricultural Produce Market Committee) फुलसावंगी बाजारपेठेत कापसाला सर्वाधिक १० हजार ४०० रुपयांचा विक्रमी दर मिळाला. यवतमाळ, राळेगाव आणि वणी बाजारपेठेतही कापसाचा दर दहा हजारांच्या 440 पार झाला. जिल्ह्याच्या ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कापसाला दहा हजारांहून अधिकचा दर मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे.

प्रतिक्रिया

32 हजार क्विंटल कापसाची खरेदी

मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला. त्यामुळे गत आठ दिवसांपासून कापसाचे दर सारखे वाढत होते. त्यातच सरकीचे दर २८०० रुपयांवरून चार हजार रुपये क्विंटलवर पोहोचल्याने खुल्या बाजारपेठेत कापसाच्या दराला झळाळी मिळाली आहे. पर्यायाने जिल्ह्यात कापसाचे दर विक्रमी १० हजाराचा टप्पा ओलांडू शकले. जिल्ह्यात बुधवारी या एकाच दिवशी 32 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली.

कापसाची आवक वाढली

जिल्ह्यातील यवतमाळ, फुलसावंगी, राळेगाव, वणी, वाढोणाबाजार, कळंब घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर या बाजार समित्यांमध्ये बुधवारी कापसाची आवक वाढली. याचवेळी कापसाचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. कापसाचा हमीदर सहा हजार २५ रुपये आहे. तर, खुल्या बाजारात कापसाचे दर दहा हजार ४०० रुपये आहेत.

उत्पादनाच्या तुलनेत कापसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटले

जिल्ह्याती 35 ते 40 लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होते. यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत केवळ 11 लाख लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत कापसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटले आहेत. त्यातच मागणी वाढल्याने दराने उसळी घेतली.

हेही Warrant Against Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.