यवतमाळ - भांबराजा टोलनाक्याजवळ उभ्या ट्रकला दुचाकीने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका युवतीचा मृत्यू झाला आहे, तर तिची बहीण गंभीर जखमी झाली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. रोशनी चंदन गुप्ता (वय १६) असे मृत युवतीचा नाव आहे.
रोशनी चंदन गुप्ता ही तिची बहीण राणी चंदन गुप्ता (वय १४) हिच्यासह शिकवणीवर्गासाठी यवतमाळला जात होती. बेचखेडा येथून यवतमाळला जात असताना भांबराजा टोलजवळ रोशनीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी उभ्या ट्रकला धडकली. यात रोशनीचा जागेवरच मृत्यू झाला, तर तिची बहीण राणी ही गंभीर जखमी झाली. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा - यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदी सुरू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा