ETV Bharat / state

विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवर लोकसहभागातून बांधला सेतू

अवघ्या 14 दिवसात 15 लाख 80 हजार रुपयांची लोकवर्गणी जमा करण्यात आली. सर्वांचा हेतू पैनगंगा नदीवरील सेतू, हेच ब्रीद वाक्य घेऊन सतत पंधरा दिवस श्रमदान करून या नदीवर सुंदर पुलाची निर्मिती झाली.

painganga
painganga
author img

By

Published : Dec 15, 2020, 3:28 PM IST

Updated : Dec 15, 2020, 3:52 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात असलेल्या विदर्भाच्या टोकावरील दोन हजार लोकवस्तीचे पळशीगाव. या गावालगत असलेल्या पैनगंगा नदी ही विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारी आहे. मात्र, या नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांसह शेतकरी व इतर नागरिकांना जवळपास 45 किलोमीटरचा फेरा मारून मराठवाड्यात वा विदर्भात यावे लागत होते. या भागातील जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी दोन्ही काठावरील गावकऱ्यांना सोबत घेऊन आपण लोकसहभागातून व श्रमदान केल्यास या पैनगंगा नदीवर पुलाचे निर्माण होऊ शकते, आता मानस व्यक्त केला. त्याला गावकऱ्यांनी जोरदार पाठिंबा देत अवघ्या 14 दिवसात 15 लाख 80 हजार रुपयांची लोकवर्गणी जमा करण्यात आली. सर्वांचा हेतू पैनगंगा नदीवरील सेतू, हेच ब्रीद वाक्य घेऊन सतत पंधरा दिवस श्रमदान करून या नदीवर सुंदर पुलाची निर्मिती झाली.

शासनाच्या मदतीविना पूल

विदर्भ व मराठवाडा या दोन्ही नदी तीरावरील गावांनी अनेक वेळा आमदार, खासदार, मंत्री, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, कुठल्याच प्रकारच्या मदत मिळू शकली नाही. यातच कोरोणाच्या काळात शासन आता एक रुपया ही मदत करणार नाही हे निश्चित झाले होते. जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी यापूर्वी लोकसहभाग व श्रमदानातून याच नदीवरील छोट्या प्रमाणात पुलाची निर्मिती केली होती. त्यामुळे या नदीवर लोकसहभागातून व श्रमदानातून मुलाची निर्मिती केल्यास शासनाकडे एक रुपयाही मागण्याची गरज पडणार नाही, असा विश्वास त्यांना होता. या पुलाची शासकीय किंमत बघितल्यास एक कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. मात्र, लोकसहभागातून व श्रमदानातून हा पूल केवळ पंधरा लाख रुपयात तयार झाला हे विशेष.

प्रत्येक गावकऱ्यांनी केले श्रमदान

लक्ष्मीपूजन म्हणजे 14 नोव्हेंबर 2020 रोजी या पुलाच्या निर्मितीला सुरुवात झाली. सतत पंधरा दिवस येथील गावकऱ्यांनी दिवसभर श्रमदान करायचे आणि रात्री याच तीरावर भजन-कीर्तन असा सोहळा पार पडत होता. स्वतः जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम या ठिकाणी ठाण मांडून बसले होते. प्रत्येक गावकऱ्यांनी आपल्यापरिने हजार, पाचशे अशी मदत तर केलीच, शिवाय ट्रॅक्टर, ट्रक, जेसीपीही इतरांनी कुठलीही किंमत न घेता या कामासाठी देण्यात आले.

शेतीला मिळणार मुबलक पाणी

पळशी मनूला या नदीवर बांधण्यात आलेल्या पुलामध्ये तीन फूट अंतरावर पाईप टाकण्यात आल्याने या नदीची पाण्याचे तीन किलोमीटर अंतर साठवणूक वाढली. पर्यायाने पाणी थांबल्याने या भागातील शेतकऱ्यांना या नदीवरील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी घेता येणार आहेत. तसेच या या पैनगंगा नदी तीरावरील गावात पाण्याच्या पातळीतही वाढ झालेली आहे.

Last Updated : Dec 15, 2020, 3:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.