ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात 504 पक्षांचा मृत्यू; 'बर्ड फ्ल्यू’ बाबत यंत्रणा अलर्ट - Chicken death Yavatmal

जिल्ह्यात मागील दोन दिवसात 504 पक्षांचा मृत्यू झाला आहे. ‘बर्ड फ्ल्यू’चे निदान व्हायचे असले तरी मृत पक्षांचे नमुने तपासणीकरीता भोपाळला पाठविण्यात आले आहेत.

Bird flu Yavatmal
बर्ड फ्ल्यू यवतमाळ
author img

By

Published : Jan 13, 2021, 7:08 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात मागील दोन दिवसात 504 पक्षांचा मृत्यू झाला आहे. ‘बर्ड फ्ल्यू’चे निदान व्हायचे असले तरी मृत पक्षांचे नमुने तपासणीकरीता भोपाळला पाठविण्यात आले आहेत. पांढरकवडा तालुक्यात लिंगटी शिवारात पोल्ट्री फार्ममधील 494 मृत पक्षांचा संसर्ग इतर ठिकाणी पसरू नये म्हणून यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी दिले.

माहिती देताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग

हेही वाचा - संध्या सव्वालाखे यांची महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

पांढरकवडा तालुक्यात लिंगटी या गावा शेजारी सायखेडा धरण असून या धरणावर परदेशातील स्थलांतरित पक्षी येतात. या गावात पोल्ट्री फार्म असल्याने मागील दोन दिवसात 494 कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे, कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाला असावा, असा अंदाज आहे. मात्र, आद्याप तपासणी अहवाल यायचा असल्याने हा संसर्ग इतर ठिकाणी पसरू नये म्हणून पशुसंवर्धन विभाग परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष ठेऊन आहे.

सद्या जिल्ह्यात कुठेही निर्बंध नाही

पोल्ट्री फार्म बंद ठेवण्याचे व निरोगी पक्षाचे चिकन खाण्यास कोणतेही निर्बंध नाही. मात्र, घरी आणलेले चिकन संपूर्णपणे उकळून (बॉईल) खावे. तसेच, ते स्वच्छ केल्यानंतर हात सॅनिटाईज करावे. कुठेही पक्षाचा मृत्यू आढळून आल्यास नागरिकांनी त्या मृत पक्षाला थेट हाताचा संपर्क करू नये. याबाबत पशुसंवर्धन विभागाशी त्वरीत संपर्क करावा. उपविभागीय अधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या संपर्कात राहून पक्षांचे आवागमन करण्यास निर्बंध घालावे. पांढरकवडा परिसरात हा प्रकार आढळून आल्यामुळे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणेला अलर्ट करून योग्य काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

प्रतीक्षा तपासणी अहवालाची

जिल्ह्यात पांढरकवडा तालुक्यात लिंगटी परिसरातील कुक्कुटपालन केंद्रात काल 200 आणि आज 286 पक्षांचा संशयित मृत्यू झाला असून, आर्णी तालुक्यात आठ मोर, दारव्हा तालुक्यात चार वराह, घाटंजी परिसरात चार कावळे आणि यवतमाळातील दोन कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे नमुने तपासणीकरिता पाठविले आहे. तपासणी अहवालाची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे.

कुक्कुट पक्षी गृहापासून 10 किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित

पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी शिवारात कुक्कुटपालन केंद्रातील पक्षांचा मृत्यू झाल्यामुळे अज्ञात रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लिंगटी गाव शिवारातील कुक्कुट पक्षी गृहापासून 10 किलोमीटर त्रिज्येतील परिसरात कुक्कुट पक्षांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच, लिंगटी हे गाव अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

हेही वाचा - दिग्रस-मानोरा रस्त्यावरील जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली; पाण्याचा अपव्यय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.