ETV Bharat / state

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे 48 पोते रेशनचे धान्य जप्त - Yavatmal crime news

गरीबाच्या हक्काचे 48 पोते धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने नेले असता, काही जागरुक नागरिकांमुळे पुरवठा विभागाद्वारे जप्त करण्यात आले आहे.

काळ्या बाजारात जाणारे 48 पोते रेशनचे धान्य जप्त

author img

By

Published : May 31, 2021, 10:49 AM IST

यवतमाळ : शासनाच्या गोदामातून परवानाधारक कंट्रोल डिलरकडे वितरणासाठी (एमएच 34 एम 1923) क्रमांकाच्या मेटॅडोअरमध्ये 48 पोते धान्य भरण्यात आले होते. शासकीय गोदामातून हा मेटॅडोअर थेट लोहारा येथे जाणे अपेक्षित होता, परंतु थेट काळ्या बाजारात जातांना पुरवठा विभागाद्वारे जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला.

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे 48 पोते रेशनचे धान्य जप्त

जागरूक नागरिकांनी पकडून दिले धान्य

गरीबाच्या हक्काचे धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने, कॉटन मार्केट चौकातील धान्य व्यापारी संजय सोदी याच्या दुकानासमोर धान्याचा मेटॅडोअर उभा करण्यात आला होता. हा प्रकार काही जागरुक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती पुरवठा विभागाला दिली. माहिती मिळताच तालुका पुरवठा अधिकारी चांदणी शिवरकर, पुरवठा निरीक्षक सतीश डोंगरे यांनी कॉटन मार्केट चौक गाठून हा शासकीय धान्याचा मेटॅडोअर ताब्यात घेतला. त्यामध्ये 19 पोते गहू व 29 पोते तांदूळ आढळून आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, सहायक पोलीस निरीक्षक चवथनकर, जमादार अजय डोळे, संतोष मसाळकर यांनी पुरवठा विभागाच्या पथकाला मदत केली.

राज्य अन्न आयोगाचे पथक जिल्ह्यात

गरिबांसाठीचे धान्य खरोखर त्यांच्यापर्यंत पोहोचते काय? आयसीडीसी प्रकल्पांतर्गत बालकांसाठीचा पोषण आहार दिला जातो का? याची पडताळणी करण्यासाठी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे जिल्हा दौऱ्यावर आले आहे. त्यांच्यासोबत उपसचिव व इतर दोन सदस्य आहेत. त्यांनी पोषण आहारासह, रेशनच्या धान्य पुरवठ्याची माहिती जाणून घेतली. राज्य अन्न आयोगाचे पथक जिल्ह्यात असतानाच यवतमाळ शहरातील रेशनच्या काळ्या बाजाराचा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा - मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे यवतमाळमध्ये आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.