यवतमाळ - बर्ड फ्लूची यवतमाळ तालुक्यात धास्ती निर्माण झाली आहे. रातचांदना येथील शेतकऱ्याच्या पोल्ट्रीफार्ममधील सोमवारी रात्री (18 जानेवारी) 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. तर आज दुपारच्या सुमारास 2 हजार 700 कोंबड्यांचा 3 हजार 700 कोंबड्यांचा मृत्यू झाला. मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
यवतामाळ तालुक्यामधील कोंबड्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळाकडे धाव घेतली. मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविले. या परिसरात दहा किलोमीटर अंतरापर्यंत अलर्ट जारी करण्यात आला. या घटनेमुळे पोल्ट्रीफार्म व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली.
हेही वाचा-बर्ड फ्लूचे संकट: मुंबईत २४ तासांत २१४ पक्ष्यांचा मृत्यू
आधी कोरोना आता बर्डफ्लूमुळे आर्थिक संकटरातचांदना येथील महंमद अमीन सोळंकी हे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून शेती करत आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी पोल्ट्रीचा व्यवसाय सुरु केला. यावर्षी पोल्ट्री फार्ममध्ये 6, 500 कोंबड्या होत्या. त्यांना चांगली आर्थिक आवक होती. अचानक आलेल्या अज्ञात आजाराने 3 हजार 700 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती पोल्ट्री व्यावसायिक महम्मद अमीन सोळंकी यांनी दिली. कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली.![कोंबड्यांचा मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ytl-04-bird-flue-vis-byte-mh-10049_19012021181111_1901f_1611060071_372.jpg)
हेही वाचा-साताऱ्यातील 'त्या' कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'नेच
शास्त्रोक्तपद्धतीने मृत कोंबड्यांची विल्हेवाट
अचानक कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याची माहिती मिळाल्या नंतर पशुसंवर्धन विभागाचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी. आर. रामटेके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजीव खेरडे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन क्रांती काटोले, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी पोहोचले. तसेच तहसीलदार कुणाल झालटे व पशुधन विकास अधिकारी रवींद्र मांडेकर या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच खड्डा करून शास्त्रोक्त पद्धतीने मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची सूचना दिल्या आहेत.
लिंगटीतील कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह
पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरण शेजारी असलेल्या लिंगटी या गावातील पोल्ट्री फार्म वरील दोन दिवसात 486 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्यांची नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.
दरम्यान, राज्यात परभणी, लातूरसह इत जिल्ह्यात बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.