यवतमाळ - कोरोना काळात कोरोना योद्ध्यांनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम केले. मात्र जिल्हा रुग्णालयांमध्ये 160 कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन दिले नाही. आता या कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी कामावरून तडकाफडकी कमी केले आहे. या अन्यायाविरोधात कर्मचाऱ्यांनी मनसेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे दाद मागितली.
हेही वाचा - अखेर काळाने गाठलेच; न्याय मागण्यासाठी जाळून घेतलेल्या 'त्या' शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू