यवतमाळ - मागील 24 तासांत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात 146 जण नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 354 जण कोरोनामुक्त झाले आहेत. चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील एक मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर तीन मृत्यू खासगी रुग्णालयातील आहे.
पॉझिटीव्हीटी दर 11.68 टक्के
शनिवारी (दि. 29 मे) एकूण 5 हजार 358 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 146 जण पॉझिटिव्ह तर 5 हजार 212 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 829 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी रुग्णालयात 837 तर गृह विलगीकरणात 992 रुग्ण आहेत.
आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 71 हजार 690 झाली आहे. मगील 24 तासांत 354 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 68 हजार 104 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 हजार 757 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यत 6 लाख 14 हजार 29 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लाख 39 हजार 797 निगेटिव्ह आहेत. जिल्ह्याचा मृत्यूदर 2.45 आहे.
रुग्णालयात 1 हजार 832 बेड उपलब्ध
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि 34 खासगी कोविड रुग्णालयात एकूण बेडची संख्या 2 हजार 278 आहे. यापैकी 446 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1 हजार 832 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 117 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 460 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 119 रुग्णांसाठी उपयोगात, 407 बेड शिल्लक व 34 खासगी कोविड रुग्णालयात एकूण 1 हजार 175 बेडपैकी 210 उपयोगात तर 965 बेड शिल्लक आहेत.
हेही वाचा - दुचाकी-चारचाकीच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू