वाशिम - पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्ध झाल्यास सैन्याला मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासणार आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीचे भान ठेवून वाशिम येथील तरुणांनी रक्तदानासाठी ॲप लॉन्च केला आहे. यामध्ये हजारो रक्तदाते एकत्र आले आहेत.
गेल्या चार वर्षांपासून गरजेप्रमाणे रक्त लागणाऱ्यांना वाशिम येथील मोरया ब्लड ग्रुप रक्त पुरवठा करीत आहे. भारत पाकिस्तानमध्ये वाढता तणाव लक्षात घेता युद्धजन्य परिस्थिती उद्भवेल. यावर मात करण्यासाठी वाशिमच्या मोरया ब्लड डोनेट ग्रुपने सैनिक व नागरिकांना रक्ताची गरज भासेल, त्यावेळी रक्त उपलब्ध करण्यासाठी अॅप तयार केला आहे. दोन दिवसांत अनेक रक्तदाते या लिंकशी जोडले गेले अून आपला ब्लड ग्रुप व माहिती टाकून रक्तदान करण्यासाठी तयार असल्याची माहिती देत आहेत.
अनेक वेळा रक्तगटाच्या लोकांना शोधण्यात त्रास होतो. रक्तदात्याची माहिती या ॲपवर असल्याने वेळेवर माहिती मिळणार आहे. तरुणांनी नागरिकांना रक्त उपलब्ध करुन त्याचा रक्तगटासह ॲप लॉन्च केला आहे. यामध्ये हजारो रक्तदाते सहभागी झाल्याची माहिती ग्रुप मेंबर यांनी दिली आहे.