वाशिम - रिसोडमधील तरुणाने मतदान केल्यानंतर बोटावरील शाई दाखवा दाढी-कटींग मोफत करा असा उपक्रम राबवला आहे. काशिनाथ कोकाटे असे त्या तरुणाचे नाव आहे.
मतदानाचा टक्का वाढून लोकशाही बळकट व्हावी, यासाठी सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा, म्हणून अनेक जण प्रयत्न करत आहेत. रिसोड येथील काशिनाथ कोकाटे यांनी आपल्या प्रतीक्षा जेन्ट्स पार्लरमध्ये मतदान करून आपली मतदानाची बोटावरील शाई दाखविल्यानंतर त्यांची मोफत दाढी कटिंग करून देण्यात येत आहे. सकाळी सात वाजतापासून दोनशेच्यावर ग्राहकांनी या पार्लरमध्ये हजेरी लावून आपली मोफत दाढी कटिंग करून घेतली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी कोकाटे यांनी सांगितले.