रिसोड (वाशिम) - रिसोड तालुक्यातील मांडवा येथील एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज (दि. 29 जून) उघडकीस आली आहे. प्रकाश अंकुश चव्हाण (वय 24 वर्षे), त्या युवकाचे नाव आहे.
प्रकाश हा शुक्रवारपासून (दि. 26 जून) घरातूनन न सांगता निघून गेला होता. त्यांनतर कुटुंबीय तसेच नातेवाईकांनी प्रकाशचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. सोमवारी (दि. 29 जून) जंगलामध्ये जळणासाठी लाकडे आणण्याकरिता गेलेल्या काही मजुरांना प्रकाश एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
चव्हाण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. मात्र, शेतीतून मिळणाऱ्या अत्यल्प उत्पादनामुळे प्रकाशच्या वडिलांवर कर्ज वाढले होते, अशी चर्चा आहे. त्यामुळे प्रकाश हा नेहमी चिंताग्रस्त दिसायचा. कदाचित याच नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अगदी उमेदीच्या काळात प्रकाश चव्हाण या युवकाच्या आत्महत्येमुळे समाजमन हेलावून गेले आहे.
हेही वाचा - ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका; रिसोड तालुक्यात 400 हेक्टर शेतीचे नुकसान