वाशिम - जिल्ह्यातील अनसिंग येथील प्राचीन शृंगऋषींच्या मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त जलाभिषेक करण्यात आला.
हिंगोली आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीचे पवित्र जल आणून शृंगऋषी मंदिरातील महादेवाच्या पिंडीला जल अभिषेक करण्याची परंपरा अनेक वर्षापासून कायम आहे. यंदाही गावातील शेकडो शिवभक्तांनी कावडीने पाणी आणून जलाभिषेक केला.
यावेळी नागरिकांनी कावडधारकाची पाणी टाकून स्वागत केले. तसेच जिल्हा दुष्काळ मुक्त व्हावा, असे साकडे शृंगऋषींना घातले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.