ETV Bharat / state

शाळेमध्ये विलगीकरणात असलेल्या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू, कारण अस्पष्ट - washim latest news

या महिलेला मंगरूळपीर तालुक्यातील शेंदुर्जना (मोरे) येथील शाळेमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

महिलेचा मृत्यू
महिलेचा मृत्यू
author img

By

Published : May 21, 2020, 6:11 PM IST

वाशिम - मंगरूळपीर तालुक्यातील शेंदुर्जना येथे मुंबईतून 20 मे रोजी आलेल्या कमला बबन पवार (वय 45) या महिलेचा मृत्यू झाला आहे.

या महिलेला मंगरूळपीर तालुक्यातील शेंदुर्जना (मोरे) येथील शाळेमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तसेच या महिलेसोबत तिच्या काही नातलगांचेसुद्धा विगलीकरण करण्यात आले होते. ही महिला व तिचे काही नातलग मुंबईतून पायी चालत आले होते. महिलेचे स्वॅब नमुने लॅबला पाठविण्यात येणार आहेत.

महिलेचा मृत्यू

या महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे सध्यातरी अस्पष्ट असून यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.