वाशिम - मंगरूळपीर तालुक्यातील मसोला येथील शेतात जाण्यायेण्याचा रस्ता एका शेतकर्याने अडवल्यामुळे गावातील 13 शेतकऱ्यांची 50 एकर जमीन पेरणीविनाच आहे. यासंदर्भात मंगरूळपीर तहसील कार्यालयात जाऊन मागील तीन वर्षांपासून रस्ता मोकळा करून देण्यासाठी हे तेरा शेतकरी पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे.
रस्ता अडवल्याने 50 एकर जमीन पेरणीविनाच, प्रश्न सोडविण्याची १३ शेतकऱ्यांची मागणी - वाशिम शेतकरी रस्ता वाद बातमी
मागील तीन वर्षापासून हा रस्ता मोकळा करण्याचा प्रश्न सुटला नसल्याने मंगरूळपीर तहसील कार्यालयाची कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळं आतातरी महसूल विभागाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी पीडित शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्याने रस्ता अडवल्याने 50 एकर जमीन पेरणीविनाच
वाशिम - मंगरूळपीर तालुक्यातील मसोला येथील शेतात जाण्यायेण्याचा रस्ता एका शेतकर्याने अडवल्यामुळे गावातील 13 शेतकऱ्यांची 50 एकर जमीन पेरणीविनाच आहे. यासंदर्भात मंगरूळपीर तहसील कार्यालयात जाऊन मागील तीन वर्षांपासून रस्ता मोकळा करून देण्यासाठी हे तेरा शेतकरी पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे.
Last Updated : Jul 5, 2020, 10:35 AM IST