वाशिम - मोठा बंगला आणि त्याच्यासमोर उभी असलेली गाडी अनेकांचे स्वप्न असतं. मात्र, खिशाला परवडत नाही म्हणून अनेकांना या आकांक्षेला मुरड घालावी लागते. तरीदेखील वाशिम शहरात जुन्या चारचाकी वाहनांच्या बाजाराने अनेकांचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण केले आहे.
नव्या गांड्यांना नव्या गाड्या पर्याय -
मध्यमवर्गातील कुटुंबीय कोरोनाच्या काळात कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे सार्वजनिक वाहतुकीस प्रवास टाळत आहे. कारण, एसटी बस असो किंवा खासगी बस यात खूप गर्दी पाहायला मिळते. म्हणून या बसेसमध्ये प्रवास करण्यासाठी अनेकांनी भीती बाळगली आहे. तसेच आपला प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी अनेक जण जुन्या चार चाकी वाहन विकत घेत आहे. कोरोना काळात याठिकाणच्या बाजाराला चांगलीच तेजी आली आहे. अगदी 50 हजाराच्या चारचाकीपासून 5 लाखांपर्यंत चारचाकींची खरेदी-विक्री याठिकाणी होते. नव्या वस्तूंबरोबरच सेकंड हँड गाड्यांना मोठा ग्राहक असल्याने विक्रीतही वाढ झाली आहे. विविध मॉडेल आणि कंपन्यांच्या गाड्या या मार्केटमध्ये बघायला मिळत असल्यामुळे ग्राहकांचा ओढाही वाढला आहे. नव्या गाड्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे मध्यम कुटुंबीयांना शक्य नसले तरी जुन्या गाड्या सर्वांसाठी पर्याय ठरू पाहत आहे.
हेही वाचा - जाणून घ्या महाराष्ट्रात आज किती आहे पेट्रोल-डिझेलचा दर..!
मुंबईच्या गाड्या लोकप्रिय -
मुंबईतील चारचाकी गाड्या अल्पकाळ वापरून विक्री करण्याचे प्रमाण जास्त आहे. शिवाय मुंबईची गाडी कमी वापरलेली असते व जुन्या गाड्यांचे दरही आवाक्यात आहेत. यामुळे अनेक ग्राहक मुंबईला जाऊन वाहने खरेदी करतात.
या गाड्या मिळतात बाजारात -
वाहन बाजारात मारुती, महिन्द्रा, टाटा, ह्युंदाई, जनलर मोटर्स, होन्डा, फोर्ड, टोयोटा, इंडिका, इंडिगो, स्विफ्ट अशा सर्वच प्रमुख वाहन कंपन्यांचे सेकंड हॅण्ड वाहने उपलब्ध आहेत. नव्या गाड्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे मध्यम कुटुंबीयांना शक्य नसले तरी जुन्या गाड्या सर्वांसाठी पर्याय ठरू पाहत आहे.