वाशिम - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण आणि त्याच्या संपर्कात आलेल्या इतर ५ जणांच्या दोन्ही चाचण्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. तसेच जिल्हा ग्रीन झोनमध्ये कायम असल्याने आनंदही व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यातील कामरगावच्या शाळेत कार्यरत अमरावती जिल्ह्यातील एक शिक्षक २१ एप्रिलला कोरोनाबाधित असल्याचे अमरावतीत स्पष्ट झाले होते. ते २ एप्रिल रोजी कामरगाव येथे तांदूळ वाटप करण्यासाठी आले होते त्यामुळे, वाशिम जिल्हा प्रशासनाने त्यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या 5 जणांना 25 एप्रिल रोजी वाशिमच्या सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. २७ एप्रिलला, त्यांचे स्वॅब नमुने तपासणीकरता पाठवले असता मंगळवारी या पाचही जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात २४ एप्रिलपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. तसेच, तर वाशिम जिल्ह्या कोरोनामुक्त असून ग्रीन झोनमध्ये कायम असल्याने जिल्हावासियांकडून आनंद व्यक्त केला आहे.