वाशिम - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी आणि कामगार कायद्याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली आहे. या स्थगिती आदेशाविरोधात भाजपाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्य सरकारने काढलेल्या स्थगिती अध्यादेशाची होळी करून भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच पजांबमध्ये काँग्रेसने ट्रॅक्टर जाळून या कायद्याचा विरोध केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार राजेंद्र पाटणी यांनी यावेळी ट्रॅक्टरची पूजा करत या कायद्याचे समर्थन केले. निषेध आंदोलनात भाजपाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान आमदार राजेंद्र पाटणी यांनी कृषी आणि कामगार कायद्यासंदर्भात कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांना माहिती दिली.