वाशिम - नागपूर येथून लग्न आटोपून परत येत असलेल्या मॅक्सीमो व्हॅनने उभ्या ट्रॅक्टरला मागून धडक ( Terrible accident in Washim ) दिली. या भीषण अपघातात व्हॅनचा अक्षरश: चुराडा होऊन ४ चार जण ठार, तर 10 जण गंभीर जखमी झाले. ही घटना वाशिम-शेलुबाजार मार्गावर ( Accident on Washim-Shelubazar road ) सोयता फाट्यानजीक मंगळवार १५ फेब्रुवारीला रात्री ९ वाजताच्या सुुमारास घडली.
चार जण ठार -
वाशिम तालुक्यातील सावंगा जहॉगिर येथील मंडळी नागपूर येथून लग्न आटोपून एमएच ४८, पी- १४४५, क्रमांकाच्या व्हॅनने गावी परत येत होते. रात्री ९ वाजताच्या सुमारास शेलुबाजार-वाशिम मार्गावर सोयता फाट्यानजिक चालकाचे नियंत्रण सुटले आणि सुसाट वेगात असलेली ही व्हॅन रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकली. त्यामुळे व्हॅनचा अक्षरश: चुराडा झाला. यात मृतक भारत गवळी (४०), सम्राट भारत गवळी (१२), पुनम भारत गवळी (३७) आणि इतर एक मिळून चार जण जागीच ठार, तर दहा जण गंभीर जखमी झाले.