वाशिम - अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मार्केट यार्डमधून होणारा टोमॅटोचा (price of tomatoes) पुरवठा कमी झाला आहे. बाजारात येणाऱ्या टोमॅटोच्या मालांपैकी निम्याहून अधिक माल खराब येत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने टोमॅटोचे भाव वाढले आहे. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि घटत्या उत्पन्नाचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या (Vegetables Prices) किमतींवर आणि सामान्य माणसाच्या स्वयंपाक घरावर होत आहे. इतर राज्यातील भाजीपाला विक्रीस येत असल्याने भाजीपाला दरात वाढ झाली असून जिल्ह्यातील सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करताना याचा फटका बसत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहे. टोमॅटो 80 ते 100 रुपये (Tomatoes 80 to 100 rupees kg) दर तर भाजीपाला 50 ते 80 च्या दरम्यान विक्री होत असून त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. मागील पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने याचा जिल्ह्यात भाजीपाला पिकावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचाच फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसला असून जिल्ह्यात टोमॅटो कलकत्ता येथून येत आहे. यासाठी 12 ते 14 हजार गाडीचे भाडे द्यावे लागत असल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळे बाजारपेठ आवक थोडक्यात असून दरात मोठ्याप्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. एका कॅरेट मागे 1300 ते 1400 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे ग्राहकांना 80 ते 100 रुपये किलो दराने विक्री करावी लागत असल्याची प्रतिक्रिया भाजी विक्रेत्यांनी दिली आहे.
- महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील टोमॅटोचे दर -
हिंगोली | 80 रुपये |
अकोला | 90 रुपये |
वाशिम | 80 रुपये |
पुणे | 100 रुपये |
पंढरपूर | 80 रुपये |
ठाणे | 70 रुपये |
नवी मुंबई | 80 रुपये |
नागपूर | 80 रुपये |
कोल्हापूर | 50 ते 55 रुपये |
सांगली | 60 ते 70 रुपये |
हेही वाचा - Vegetables Prices Hike : नागपुरात भाजीपाल्याचे दर कडाडले