ETV Bharat / state

वैशाली येडेंच्या प्रचाराचा हटके अंदाज, सोशल मीडियावर फोटो व्हायरल - bus

अनोख्या पद्धतीने रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल केला. रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा सर्वत्र होत असून आता याच उमेदवार वैशाली येडे रोज आपले गाव राजुर येथून बसने प्रवास करत आहेत

वैशाली येडेंनी असा केला प्रचार
author img

By

Published : Mar 29, 2019, 10:03 AM IST

यवतमाळ - मराठी साहित्य संमेलनात आपल्या भाषणाने संमेलन गाजविणाऱ्या वैशाली येडे सध्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात प्रहारकडून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्या आता निवडणुकीचे मैदान गाजवीत आहेत. प्रहारने सर्वसामान्य शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त कुटूंबातील वैशाली येडे यांना उमेदवारी देऊन जिल्ह्याच्या राजकारणात वेगळे वातावरण निर्माण केले.

त्यानंतर अनोख्या पद्धतीने रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल केला. रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा सर्वत्र होत असून आता याच उमेदवार वैशाली येडे रोज आपले गाव राजुर येथून बसने प्रवास करत आहेत आणि प्रवासाने मतरूपी पाठिंबा सुद्धा मागत आहेत. वैशाली येडे यांनी राजूर ते यवतमाळ असा ३५ किलोमीटरचा प्रवास बसने करून आपल्यातील सर्वसामान्य माणसाची ओळख करून दिली आहे.

वैशाली येडेंनी असा केला प्रचार

आलिशान मोठ्या गाडीशिवाय कार्यकर्तेसुद्धा प्रचार करीत नाही. मात्र, वैशाली येडे यांनी अशा पद्धतीने केलेला बस प्रवास चर्चेचा विषय बनला आहे. वैशाली येडे या प्रहार जनशक्ती पक्षाच्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात गरीब उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. त्यांच्या निवडणुकीसाठी प्रहारकडून झोळी फिरवून लोकवर्गणी सुद्धा गोळा केली जात आहे. त्यांच्या बस प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटिझन्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Intro:वैशाली येडे यांचा बसमधून प्रचारBody:यवतमाळ - मराठी साहित्य संमेलनात भाषनाणे संमेलन गाजविणाऱ्या वैशाली येडे ह्या सध्या यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात प्रहार कडून निवडणूक लढवीत असून त्या आता निवडणुकीचे मैदान गाजवीत आहेत.

प्रहारने सर्वसामान्य कुटूंबातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटूंबातील वैशाली येडे याना उमेदवारी देऊन जिल्ह्याच्या राजकारणात वेगळे वातावरण निर्माण केले. त्यानंतर अनोख्या पद्धतीने रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल केला. रक्तदान करून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा सर्वत्र होत असून आता याच उमेदवार वैशाली येडे रोज आपले गाव राजुर तालुका कळंब येथून बसने येजा करीत आहेत. आणि प्रवासानं मतरूपी पाठिंबा सुद्धा मागत आहेत. वैशाली येडे यांनी आज राजूर तालुका कळंब ते यवतमाळ असा ३५ किलोमीटरचा प्रवास बसने करून आपल्यातील सर्वसामान्य असल्याची ओळख करून दिली.
वैशाली येडे आज आपल्यागावहून यवतमाळला उमेदवारी अर्ज छाननी व चिन्ह वाटप साठी आल्या. आज पाहिलं तर आलिशान मोठ्या गाडीशिवाय कार्यकर्ते सुद्धा प्रचार करीत नाही. मात्र, वैशाली येडे यांनी अश्या पद्धतीने केलेला बस प्रवास चर्चेचा विषय बनला आहे. वैशाली येडे ह्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या १४ यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात गरीब उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. त्याच्या निवडणुकीसाठी प्रहार कडून झोळी फिरवून लोकवर्गणी सुद्धा गोळा केली जात आहे. आज त्याच्या या बस प्रवासा मुळे त्या आणखी चर्चेत आल्या आहेत. त्याच्या बस प्रवासाचे फोटो विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असून त्याला नेटिझन्स कडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.