वाशिम - वाशिम जिल्ह्यातील कारखेडा येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या "दिक्षा"च्या विवाहाला सामाजिक दिशा देत ग्रामपंचायतीने कूटूंबाचे कर्तव्य पार पाडले तर मानोर्याचे ठाणेदार यांनी सपत्नीक कन्यादान करत दिक्षाच्या आई-वडिलांची भूमिका निभावली. या अगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत असून ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
![unique-wedding-ceremony-](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-wsm-spl-rtu-anath-mulgi-lagan-police-washim_31052021142725_3105f_1622451445_886.jpg)
कारखेडा येथे एका अनाथ मुलीचं लग्न ठरलं हे माहीत झाल्यावर मी स्वतःहून कन्यादान करण्याचं ठरवलं आणि मला मुलगी नसल्याने माझ्या हाताने कन्यादान होईल का नाही. अस वाटलं होतं मात्र आज मी दिक्षाचे कन्यादान केल्यामुळं मला एक मुलगी असल्याची जाणीव झाल्याचे ठाणेदार शिशिर मानकर यांनी म्हटलं.दीक्षा डाखोरे या अनाथ मुलीचे लग्न ठरल्याचे समजल्यावर मी सरपंच याना फोन करून मुलीचा मामा होऊन मी लग्नात सहभागी होणार असल्याचे म्हटले आणि मला ती संधी मिळाली. त्यामुळं मी माझे भाग्य समजतो असे विस्तार अधिकारी संजय भगत यांनी सांगितलं.लहानपणीचे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तर काही दिवसापूर्वी आईचे निधन झाले. त्यामुळे माझं लग्न कसं होईल, असा प्रश्न होता. मात्र ग्रामपंचायतीने माझ्या लग्नाचा खर्च केला तर वडील म्हणून ठाणेदार यांनी भूमिका पार पाडली. त्यामुळे मला आई-वडिलांची आठवण झाली नसल्याचे दिक्षाने सांगितले.राज्यभरात आई-वडिलांचे छत्र हरविलेले अनेक अनाथ मुलं मुली असून त्यांची हेळसांड होताना आपण बघतो. मात्र कारखेडा ग्रामपंचायतने अशा अनाथ मुलांना दत्तक घेवून त्यांची सर्वच जबाबदारी घेत आहे. तर आज अशाच एका अनाथ दिक्षाचं लग्न करून कुटुंब प्रमुखांची भूमिका पार पाडली. यांच्याप्रमाणेच राज्यातील इतर ग्रामपंचायतीने हा आदर्श घेतला तर अनाथ मुलांना खरा न्याय मिळेल, यात मात्र शंका नाही.