वाशिम - विहीर खचल्यामुळे दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रिसोड तालुक्यातील वाकद शिवारातील एकलासपूर येथे २२ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. मृत व्यक्ती विहिरीच्या मलब्यात दबले होते. गजानन देविदास लाटे (वय ३५) व प्रभाकर गवळी (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत.
हेही वाचा - Bee Attack Washim : आगेमोहोळच्या हल्ल्यात १३ जण जखमी, ३ गंभीर; वाशिमच्या कारंजा तालुक्यातील घटना
रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील शेतकरी गजानन मुळे यांच्या शेतात २२ मार्च रोजी वाकद येथील गजानन देवीदास लाटे व प्रभाकर गवळी यांच्यासह काही मजूर काम करीत होते. अचानक दुपारी चार वाजताच्या सुमारास विहिरीचा एक भाग कोसळला. त्यामुळे मलब्याखाली आलेले गजानन देवीदास लाटे व प्रभाकर गवळी हे जागीच दगावले. तर, शेख अकत्तर शेख दादू हा मजूर गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला व पायाला जबर मार लागल्याने त्याला मेहकर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेतील दोन्ही मृत युवक घरातील मुख्य असून, त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकलासपूर वाकद गावातील ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यासाठी सहकार्य केले.
हेही वाचा - Dead Infant found In Washim : धक्कादायक! वाशिममध्ये रस्त्याच्या कडेला आढळले मृत अर्भक