ETV Bharat / state

पारवा येथे दोन घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपिर तालुक्यातील पारवा इथल्या बाळू मस्के आणि ज्ञानेश्वर मस्के या दोन भावंडाच्या घराला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

पारवा येथे दोन घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान
पारवा येथे दोन घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान
author img

By

Published : Mar 13, 2021, 8:54 PM IST

वाशिम - वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपिर तालुक्यातील पारवा इथल्या बाळू मस्के आणि ज्ञानेश्वर मस्के या दोन भावंडाच्या घराला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये मोठं नुकसान झालं आहे.

या आगीत घरात असलेली 18 क्विंटल तूर, 20 क्विंटल गहू, एक दुचाकी, नवीन लोखंडी कपाट, कुलर लग्नाचा बस्ता, दिवाण आणि गादी, संसारोपयोगी साहित्य, टिनपत्रे अशा एकूण 2 लाख 94 हजारांच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

पारवा येथे दोन घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

16 मार्चला होते मुलीचे लग्न

बाळू मस्के यांच्या मुलीचं लग्न 16 मार्चला असल्याने लग्नासाठी आणलेलं सर्व साहित्य व एक मोटार सायकल तसेच घरातील धान्य आगीत जळून खाक झाले आहे आहे. त्यामुळे मुलीच्या लग्नासाठी आता पुन्हा एकदा सामान खरेदी करण्याची वेळ बाळू मस्के यांच्यावर आली आहे. दरम्यान आगीमुळे झालेल्या नुकसानाने मस्के कुटुंबीय हवालदिल झाले असून, मुलीच्या लग्नासाठी पुन्हा वस्तू घेण्यासाठी पैसा कोठूण आणायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.