ETV Bharat / state

मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर लहान भावाने सोडले जग; बंधूप्रेम पाहून मित्राचेही निधन - वाशिमध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू

मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेत असलेल्या मोठ्या भावाच्या निधनाचे वृत्त कळताच लहान भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. दोन भावांचे प्रेम पाहून गावातील धनुर्धर लक्ष्मण कोल्हे यांचाही हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. एकाच दिवशी तीन जणांचे निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

वाशिम
वाशिम
author img

By

Published : Jun 28, 2021, 10:33 AM IST

वाशिम - बंधुप्रेम तुम्ही चित्रपटात पाहिले असेलच. भावांचे एकमेंकावरील अतुट प्रेम दर्शवणारी घटना वाशीमच्या मानोरा तालुक्यातील शेवटच गाव असलेल्या सोयजनात घडली आहे. मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेत असलेल्या मोठ्या भावाच्या निधनाचे वृत्त कळताच लहान भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. दोन भावांचे प्रेम पाहून गावातील धनुर्धर लक्ष्मण कोल्हे यांचाही हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. एकाच दिवशी तीन जणांचे निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

मानोरा तालुक्यातील सोयजना येथील जनार्दन सीताराम पवार (75) हे मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर वर्धा येथील सावंगी मेघेच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवार 27 जून रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव घरी आणले. ते पाहूनच त्यांचे लहान बंधू मुरलीधर सीताराम (70) यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोयजनावासीयांना सुन्न करणारी ठरली. या दोन भावांचे प्रेम पाहून गावातील धनुर्धर लक्ष्मण कोल्हे (55) हेही भारावले आणि जनार्दन पवार यांचे अंत्यसंस्कार पार पाडून घरी परतल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचेही निधन झाले.

अर्ध्या तासाच्या फरकानेच दोघांचा मृत्यू -

जनार्दन पवार यांचे पार्थिव पाहून त्यांचे लहान बंधू मुरलीधर पवार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तर जनार्दन पवार यांचे अंत्यसंस्कार पार पाडून घरी परतल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासानेच धनुर्धर कोल्हे यांनाही हृदयविकाराचा धक्का बसला. उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची संधीही त्यांच्या नातेवाईकांना मिळू शकली नाही. मुरलीधर पवार यांच्या मृत्यूनंतर अवघ्या अर्ध्या तासातच धनुर्धर कोल्हे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकमग्न झाले.

हेही वाचा - वाशिमच्या सुपखेला फाट्याजवळ ट्रक व कारचा भीषण अपघात; एकजण ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.