ETV Bharat / state

वाशिम : निर्बंधामुळे विघ्नहर्त्याची मूर्ती साकारणाऱ्यांवरच विघ्न - washim latest news

वाशिम जिल्ह्यातील सावरगाव बरडे या गावाची 'देव साकारणार गाव' म्हणून आहे. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी सरकारने निर्बंध लादल्यामुळे वाशिम जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याची मूर्ती बनविणाऱ्यांवर मोठे विघ्न आले आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 17, 2021, 5:22 PM IST

Updated : Jul 17, 2021, 6:34 PM IST

वाशिम - विघ्नहर्त्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यामुळे बाप्पाच्या आगमनासाठी भक्तांची लगबग सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील सावरगाव बरडे या गावाची ओळख 'देव साकारणार गाव' म्हणून आहे. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी सरकारने निर्बंध लादल्यामुळे वाशिम जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याची मूर्ती बनविणाऱ्यांवर मोठे विघ्न आले आहे.

निर्बंधामुळे विघ्नहर्त्याची मूर्ती साकारणाऱ्यांवरच विघ्न

सावरगावात गणेश मूर्ती बनिवण्याचे काम वर्षभर सुरू असते. मात्र, जून महिन्यापासून या कामाला खरा वेग येतो. सार्वजनिनक गणेश मंडळाबरोबरच घरगुती मूर्तींचीही मोठी मागणी असते. मात्र, कोरोनाच्या पाश्वशूमीवर सरकारने मागील वर्षी गणेश उत्सावावर निर्बंध लादले होते. यंदा सर्व सुरळीत होईल, या आशेने मूर्तीकारांनी गणेश मूर्ती तयार केल्या. मात्र, सरकारने यंदाही निर्बंध घातल्यामुळे सावरगावतील मूर्तींसाठीची मागणी घटली आहे. याचा परिणाम मूर्तीकारांवर झाला आहे. यामुळे येथील मूर्तीकारांवर मोठे आर्थीक संकट आले आहे.

या जिल्ह्यातून होत होती मागणी

दरवर्षी वाशिम जिल्ह्याव्यतिरिक्त अकोला, बुलडाणा, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यात गणेश मूर्ती पाठवल्या जातात. साधारण ग्रामीण भागात शहरातून मूर्ती नेल्या जात असल्याचे पहावयास मिळत होते. पण, दोन वर्षांपासून कोरोनामुळे इतर जिल्ह्यातून मूर्तींची मागणीच झाली नाही.

लाखोंची उलाढाल ठप्प

देव साकारणारा गाव, अशी ओळख असलेल्या सावरगावमध्ये अनेकांचा मूर्ती बनविण्याचा व्यवसाय आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या निर्बंधामुळे मूर्तींची मागणी घटली आहे. परिणामी वर्षभर तयार केलेल्या मूर्तींची विक्री होणेही मुश्किल झाले आहे. यामुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे.

हेही वाचा - ..तर परिणाम भोगावे लागतील; संजय राठोडांना विरोध करणाऱ्या भाजपाला पोहरादेवीच्या महंतांचा इशारा

Last Updated : Jul 17, 2021, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.