वाशिम - येथील नालंदानगरमधील स्त्री रूग्णालयात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे, हजारो रूग्ण या रूग्णालयात उपचार घेत आहेत, मात्र रूग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही .अगोदरच कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढली. त्यातच खराब रस्त्यांमुळे अपघात होवू शकतो. सुदैवाने दररोज शकडो अॅम्ब्युलन्स जावूनही अद्याप अपघात घडला नाही. मात्र खराब रस्त्यांमुळे हा रस्ता मृत्यूचा मार्ग ठरू शकतो .
रस्ता ठरू शकतो मृत्यूचा मार्ग
स्त्री रूग्णालयात दररोज शेकडो रूग्ण घेवून अॅम्ब्युलन्स या खराब रस्त्यांवरून जीवन मरणाची वाहतुक करीत आहेत, मात्र हाच रस्ता रूग्णालयाचा नसून मृत्यूचा मार्ग बनवू शकतो. शहरातील शासकीय महिला रूग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रुग्णालयामध्ये कोविड सेंटर सुद्धा आहे, त्यामुळे येथून प्रत्येक दिवशी शेकडो अॅम्ब्युलन्स वाहतूक करतात, यामुळे रूग्णांसह नागरिक ही त्रस्त झाले आहे. वाशिम येथील शासकीय महिला रूग्णालयात जिल्ह्यातून कोरोना रुग्ण उपचारासाठी येतात, यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते .
रस्ता दुरूस्त करण्याची मागणी
कोविड केअर सेंटर मार्गावरून पालकमंत्र्यांसह विभागीय आयुक्त व अधिकाऱ्यांनी स्त्री रूग्णालयाला भेटी दिल्या, मात्र या रस्त्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही ही बाब अकलनीय आहे. त्यामुळे या रस्त्याकडे लक्ष देवून रस्ता दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा- कालपर्यंत 12052 बालकांना कोरोनाची लागण - मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयात ग्वाही