वाशिम - कापणी करून ठेवलेल्या गहू पिकाच्या गंजीला अचानक आग लागली. त्यात शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. ही घटना मानोरा तालुक्यातील कारखेडा शिवारात मध्यरात्री घडली.
हेही वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरण : मुंबई पोलिसांचा हलगर्जीपणा, की षडयंत्र?
शेतकऱ्याचे मोठे नुकसान -
वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील अनिल सिताराम काजळे या शेतकऱ्यांच्या शेतातील दोन एकरात असलेल्या गहू पिकाची कापणी करून शेतात गंजी लावून ठेवली हाेती. दरम्यान काल रात्रीच्या सुमारास शेतातील गंजीला अज्ञात इसमाने आग लावली असून यामध्ये शेतकऱ्याचं लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे त्यात संपूर्ण पीक जळून खाक झाले.
या आगीत गहू पिकासह, शेतातील स्पींकलर पाईप, ताडपञी, संञाची झाडे जळाली आहेत. यामुळे शेतकऱ्याचं मोठे नुकसान झालं असून, ही आग सुडाच्या भावनेतून लावली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - पाच फोन कॉल, हिरेन- वाझे भेट अन दहा मिनिटांची चर्चा; एनआयएच्या हाती महत्वाचा पुरावा