वाशिम - एमपीएससीची परीक्षा रद्द झाल्याने वाशिममधील विद्यार्थी आक्रमक झाले आहे. त्यांनी वाशिम शहरातील अकोला नाका चौकात रास्ता रोको केला आहे. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली. रास्ता रोकोमुळं अकोला - नांदेड या महामार्गावरील काहीवेळ वाहतूक थांबली होती.
हेही वाचा - 'खलनायकही ताकदीचा लागतो! पुढील साडेतीन वर्ष विरोधकांनी अशीच भूमिका साकारावी'
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाविरोधात एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले असून, वाशिममध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहरातील अकोला नाक्यावर नांदेड अकोला रोडवर रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे..
परीक्षा रद्द केली जाऊ नये अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हेही वाचा - कोरोनालसीचा डोस घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला लॉकडाऊनचा इशारा